Monday, October 5, 2015

साबुदाणा थालीपीठ - sabudana thalipeeth

साबुदाणा थालीपीठ - sabudana thalipeeth

साहित्य :
  • साबूदाणा - 1 कप 
  • बटाटा - 2 (उकडलेले )
  • शेंगदाणे - 1 टेस्पून ( भाजून ठेचून बारीक केलेले)
  • तूप - 2 चमचे
  • आले - 1 चमचा ( किसलेले )
  • हिरवी मिरची - 2 ( बारीक चिरून )
  • जिरे - 1/2 टिस्पून
  • मिरपूड  - 1/4 चमचा (बारीक केलेले )
  • मीठ - स्वादानुसार 
कृती :
  • एका भांड्यामध्ये साबुदाणा टाकून त्यात २ ते ३ कप पाणी टाका व ४ ते ५ तासाकरिता बाजूला ठेवा . जेणेकरून साबुदाणा चांगल्या पद्धतीने मुरेल . आता त्यातले सर्व पाणी काढून घ्या. 
  • एका भांड्यात बटाटे सोलून बोटांच्या मदतीने कुच्करीत टाका . आता त्यात मुरलेला साबुदाणा , शेंगदाणे , आले, हिरवी मिरची, जिरे , मिरेपूड आणि मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्या . व घट्ट असा गोळा तयार करा . 
  • तवा ग्यासवर थोडा गरम करायला ठेवा , थोडे तेल हाताला लावा , व व कोरपाटावरती प्लास्टिक पेपर  त्याला सुद्धा थोडे तेल लावा . आता तयार गोळ्याचा एक तुकडा घ्या व प्लास्टिक पेपर वरती बोटांच्या मदतीने पोळी तयार करा . व मध्ये एक छिद्र पाडा जेणेकरून तुम्हाला त्यात तेल टाकता येईल . 
  • आता तवा गरम झाला असल्यास तयार पोळी त्यावर टाका मध्ये आणि भोवताली थोडे तेल सोडा व हलका तपकिरी रंग होईपर्यंत भाजू द्या . नंतर पोळी ला पलटून थोडे तेल टाकून भाजू द्या . 
  • तुमचे गरमा गरम साबुदाणा थालीपीठ तयार आहेत , तुम्ही हे दह्यासोबत सर्व करू शकता . 

Sunday, October 4, 2015

साबुदाणा वडा - Shabudana Wada

साबुदाणा  – 1 कप
बटाटे   -  2 मोठ्या आकाराचे
शेंगदाण्याचा कूट  -  आधा कप
हिरव्या मिरच्या – ४ -५
जिरं
मीठ – चवीनुसार
तेल

कृती – 1) साबुदाणा पाण्यात ४-५  तास भिजत ठेवा( माऊ होई पर्यंत ) जास्तीचे पाणी  काढून घ्या
2) बटाटे उकडून घ्या . थंड झाल्यानंतर कुस्करून घ्या.
3) शेंगदाणे भाजून त्याची साल काढून जाडसर बारीक करून घ्या
४) हिरव्या मिरच्या बारीक वाटून घ्या
५) भिजवलेला  साबुदाणा, कुस्करून घेतलेले बटाटे , शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरचीचे वाटण, जिरं आणि
चवीपुरते  मीठ हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या.
6) मिश्रणाचे लहान गोळे करून घ्या आणि दोन्ही हाताने चपटे करा
7)  कढईमध्ये तेल गरम घ्या ,  मध्यम आचेवर वडे ब्राऊन रंग होईस्तोवर तळून घ्या .

साबुदाणा खिचडी - Shabudana Khichadi

साहित्य -

साबूदाणा ( साबुदाणा ) - 100 ग्रॅम .
तेल  - 1.5 टेबल चमचा .
हिरवी मिरची - 2-3 (चिरलेलि)
शेंगदाणे कुट  - 1/2 वाटी .
बटाटा - 1 ( मध्यम आकाराचे )
मीठ - आवशाक्तेनुसार 
नारळ - 1 टेबल चमचा ( किसलेले ) ( पर्याय )

कृती -

सर्व प्रथम शाबूदाणा धुवून एका भांड्यात पुरेसे पाणी टाकून ४ तास भिजर ठेवावा.
शाबूदाणा भिजल्यानंतर त्यातील जास्तीचे पाणी काढून घ्या .
नंतर ग्यास वर कढई ठेऊन शेंगदाणे भाजून घ्या, व त्यांचा आवश्क्तेनुसार कुट करून घ्या .
एका भांडयामध्ये बटाटा पूर्ण बुडेल इतके पाणी टाकून बटाटा उकडायला ठेवा आणि तो उकडल्या नंतर सोलून बारीक तुकडे करून घ्या .
नंतर कढई ग्यास वर ठेऊन त्यात तेल टाका . तेल गरम झाल्यानंतर त्यात हिरवीमिरची परतून ध्या .
व त्यात बटाटा सोडा . बटाटा तपकिरी रंगाचा होईपर्यंत तळा .
आता त्यात शाबूदाणा व शेंगदाणे कुट टाका आणि आवशकतेनुसार मीठ टाकून व्यवस्तीत मिक्क्ष करून घ्या.
कढई वर झाकण ठेऊन ४ ते ५ मिनिटे वाफवून द्या . मधून मधून शाबूदाणा खाली चिकटणार नाही यासाठी हलवत रहा .

आता त्यात किसलेला नारळ टाकून गरम गरम सर्व करा .

खोब्र्याच्या वड्या - coconut barfi


साहित्य :
  • 1 कोरडे नारळ ( खवलेले )
  • ५ ते ६ सोलून वेलची पूड
  • 300 gm साखर ( पावडर केलेली )
  • 2 ते 3 टिस्पून तूप
  • केशर 1 चिमूटभर , ठेचून किंवा केशर पावडर 2 ते 3 चिमूटभर (ऐच्छिक)
  • 8 ते 10 काजू तुकडे ( पर्यायी)
कृती :
  • सर्वप्रथम एका भांड्यात दुध गरम करून घ्या. 
  • आता त्यात खवलेले नारळ चांगले ढवळून त्याला एका तासाकारिता बाजूला ठेवा. 
  • आता एका भांड्यात तुप टाकून जरा गरम झाल कि त्यात पाणी व साखर टाकून दोन तारी चाचणी तयार करा . 
  • त्यात नारळाचे मिश्रण टाकून चांगले ढवळा, आता एका पसरट भांड्याला थोडे तूप लाऊन तयार मिश्रण टाका व व्यवस्थित पसरून घ्या. 
  • थोड्या केसरच्या वा काजूच्या तुकड्यांनी जरा सजवा व थंड व्हायला बाजूला ठेवा . 
  • थंड झाले कि तयार मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे काप  करून अलगत वेगळे करा . 
  • आता तुमच्या खोब्र्याच्या वड्या तयार आहेत , तुम्ही यांना एका हवा बंद डब्यात भरून हवे तेव्हा खाऊ शकता . 

नारळाचे लाडू - Naralache Ladu

नारळाचे लाडू - Naralache Ladu
साहित्य :
  • 1 कोरडे नारळ ( खवलेले )
  • ५ ते ६ सोलून वेलची पूड
  • 300 gm साखर ( पावडर केलेली )
  • १ ते १.५ कप दुध 
  • 2 ते 3 टिस्पून तूप
  • केशर 1 चिमूटभर , ठेचून किंवा केशर पावडर 2 ते 3 चिमूटभर (ऐच्छिक)
  • 8 ते 10 काजू तुकडे ( पर्यायी)
कृती :
  • सर्वप्रथम एका भांड्यात दुध गरम करून घ्या. 
  • आता त्यात खवलेले नारळ चांगले ढवळून त्याला एका तासाकारिता बाजूला ठेवा. 
  • आता एका भांड्यात तुप टाकून जरा गरम झाल कि त्यात पाणी व साखर टाकून दोन तारी चाचणी तयार करा . 
  • त्यात नारळाचे मिश्रण टाकून चांगले ढवळा, आता एका पसरट भांड्याला थोडे तूप लाऊन तयार मिश्रण टाका व व्यवस्थित पसरून घ्या. 
  • थोड्या केसरच्या वा काजूच्या तुकड्यांनी जरा सजवा व थंड व्हायला बाजूला ठेवा . 
  • थंड झाले कि तयार मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे हाताच्या मदतीने लाडू बनवायला घ्या . . 
  • आता तुमचे नारळाचे लाडू  तयार आहेत , तुम्ही यांना एका हवा बंद डब्यात भरून हवे तेव्हा खाऊ शकता .